पु. ल. च्या मी वाचलेल्या काही पुस्तकातले मला आवडले प्रसंग आणि वाक्ये...
फ आणि ह
जन्म आणि मृत्यू ह्या दोन
टोकाच्या मध्ये पकडून नियतीने
चालवलेली आपल्या सगळ्यांची
फसवणूक एकदा लक्ष्यात आली की
त्यातून सुतायला आपली आणि आपुलकीने
भोवताली जामणार्या माणसांची "हसवणूक"
करण्यापलिकडे आणखी काय करायचे?
- पु. ल. देशपांडे
हवे ते , हवे त्या वेळी आणि हवे तितके खाऊ न देणारी व्यक्ती म्हणजे आई !
पंचतारांकीत हॉटेल मधले दिवे हे उजेड करण्यासाठी नसून अंधार करण्यासाठी असतात !
मास्तारांचे पूर्वीच्या काळी गुर्जी झाले नव्हते ,
तसेच आईबपांचे पालक झाले नव्हते .
'पालक' हा तत्कालीन मराठीत पालेभाजीचा एक प्रकार होता.
"द्रौपदी कपाळावर कुंकावचे पाच ठिपके लावत होती का ?" ह्या प्रश्नात खरतर मारण्यासारकखे काहीच नव्हते.
नाटकात मी शिवाजी चे काम करून पहिले बक्षीस मिळवल्यानंतर दुसर्या दिवशी इतिहासाचे मास्टर अत्यंत खत्रूडपणे म्हणाले
"अहो गोब्रम्हन्प्रतिपलक , सातव्या हेन्री ने काय केले?"
"आठव्या हेन्री ला जन्मा दिला.", मी शिवाजीचे गंभिर्या चेहर्यावर ठेवून उत्तर दिले.
माशीच्या मृत्यू वरील प्रसिद्ध विलापिका
अहाहा ! आम्रफल मोसम येईल
आम्ही असु पार तू नसशील
फेकु सालटि चोखुनी चोखुनी
तुजविणा पर जातील वाळुनी.
नस्ती उठाठेव ....
माल लहानपनापासुनच पत्रकारीतेची आवड असल्यामुळे मी गणितातली काळ काम वेगाची उदाहरणे मथळे देउन सोदवित असे .
अ चा क वर अक्षम्य जुलुम
एक काम करताना अ या गुंड मजुराने क या गरीब मजुराला अक्षरशा बनवले.
आपण फक्त १/२९ काम करून क या मजुराला १/३२७ काम करायला लावले.
अ चे हे वर्तन माणुसकीला न शोभनारे आहे.
किवा हौदाच्या गणितात 'हौदवाल्यांची फसवफसवी' ह्या खुल्या मथळ्याखाली आजकाल हौद्अवाले कश्याप्रकारे फुटके व गळके हौद विकुण ग्राहकाची फसवणुक करत आहेत याचे रसभरित वर्णन करीत असे.
No comments:
Post a Comment